मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. दक्षिणेच्या अनेक चिक्रपटांचे हिंदीमध्ये रिमेक होत असून त्यातील बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर खणखणाटही करत आहेत. दक्षिणेत प्रसिद्ध असलेले हिरो-हिरॉईन बॉलिवूडमध्ये मोठ्या संख्येने पदार्पण करत आहेत. मात्र, सध्या चर्चा आहे ती दाक्षिणात्य सुपरस्टार आणि अर्जुन रेड्डी फेम विजय देवराकोंडाची. विजय देवराकोंडा करण जोहरच्या ‘लायगर‘ चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
खरेतर या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. परंतु नाव ठरले नव्हते. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. जगन्नाथ यांनी अनेक सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. लायगरमध्ये विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे असून हा रोमँटिक अॅक्शनपट आहे. रोनित बोस रॉय, रामया कृष्णन आणि विशू रेड्डी हेदेखील महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसणार आहेत.