महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

..म्हणून 'कलंक'चं टायटल ट्रॅक नाही झालं प्रदर्शित, करणनं मागितली माफी - varun dhawan

आता हे गाणं शनिवारी म्हणजेच आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

आज प्रदर्शित होणार कलंकचं टायटल ट्रॅक

By

Published : Mar 30, 2019, 8:27 AM IST

मुंबई- करण जोहरची निर्मिती असलेल्या कलंक चित्रपटाचं टायटल ट्रॅक शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होतं. 'कलंक नहीं इश्क हैं काजल पिया' असं या गाण्याचं शीर्षक आहे. मात्र, शुक्रवारी प्रेक्षक या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतानाच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हे गाणं शनिवारी म्हणजेच आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

कलंकच्या संपूर्ण टीमकडून मी प्रेक्षकांची माफी मागतो. गाण्याच्या गायकांना या गाण्याचं बेस्ट व्हर्जन प्रेक्षकांसमोर मांडण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता हे गाणं एक दिवस उशीरा म्हणजेच शनिवारी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे त्याने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

कलंकच्या टायटल ट्रॅकला अरजित सिंग, प्रितम आणि अमिताभ यांनी आवाज दिला आहे. या गायकांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकेल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता या गाण्यासाठी प्रेक्षकांना आणि विशेषतः अरजितच्या चाहत्यांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details