मुंबई- कंगना रानावतने नेहमीच बॉलिवूडमधील स्टार किड्स आणि नेपोटिझ्मवर टीका केली आहे. अलीकडे केलेल्या नव्या ट्विटमध्ये तिने पुन्हा एकदा चित्रपट निर्माते करण जोहर, आदित्य चोप्रा आणि महेश भट्ट यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर आपला निशाणा साधला. हे लोकच सुशांतच्या छळासाठी जबाबदार असल्याचे तिने म्हटलंय.
"करण जोहर, आदित्य चोपडा, महेश भट्ट, राजीव मसंद आणि रक्तपिपासू गिधाडांच्या संपूर्ण सैन्यासह माफिया मीडियाने सुशांतला ठार मारले. कुटूंबाचा एकुलता एक मुलगा सुशांतने बॉलिवूडमधील गुंडगिरी, शोषण आणि छळ यामुळे आत्महत्या केली आणि इथे करण जोहर आपल्या स्टार मुलांना प्रोत्साहन देत आहे! लज्जास्पद.." असे कंगनाने तिच्या अधिकृत ट्विटरवर म्हटले आहे.
मंगळवारी करण जोहरने पोस्ट केलेल्या ट्विटवर कंगनाचे हे ट्विट केले आहे. करण जोहरने आपल्या जुळ्या मुलांची प्रेरणा घेऊन मुलांसाठी एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्कताकाचे प्रमोशन करण करीत होता.