मुंबई - 'बाहुबली' प्रभास आणि श्रद्धा कपूर त्यांच्या आगामी 'साहो' चित्रपटाचं दमदार प्रमोशन करत आहेत. छोट्या पडद्यावरील विविध कार्यक्रमांमध्ये ते हजेरी लावत आहेत. कॉमेडी किंग कपिलच्या 'द कपिल शर्मा शो'मध्येही प्रभास, श्रद्धा आणि नील नितीन मुकेश यांनी हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्माने त्यांच्यासोबत भरपूर धमाल केली.
प्रभासचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही प्रचंड फॅन फोलोअर्स आहेत. 'बाहुबली'च्या सीरिजनंतर तो ग्लोबल स्टार बनला आहे. आता 'साहो' चित्रपटाच्या निमित्ताने तो बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेत आहे. २९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक अॅक्शन सिन्स, महागडे लोकेशन्स, ग्राफिक्स इफेक्ट्स, व्हिएफएक्स यावर प्रचंड खर्च करण्यात आला आहे. जेव्हा कपिलने त्याला चित्रपटाचं एकूण बजेट विचारलं तेव्हा प्रभासने दिलेल्या उत्तरानंतर कपिलची बोलती बंद झाली.