मुंबई- टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कपिल शर्माला आणखी जवळून जाणून घेण्याची संधी आता चाहत्यांना मिळणार आहे. खरंतर कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. फुक्रे चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा हे कॉमेडी किंग कपिल शर्माच्या बायोपिकवर काम करणार आहेत. चित्रपटाचे शीर्षकही ठरले आहे.
चित्रपट निर्माते महावीर जैन यांनी शुक्रवारी कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा केली. कपिलच्या बायोपिकचे नाव 'फनकार' असे निश्चित करण्यात आले आहे. लायका प्रॉडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.