मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. खडतर प्रवासानंतर आज लोकप्रियतेच्या या शिखरावर पोहोचलेल्या कंगनाला चक्क महेश भट्ट यांनी सुरुवातीच्या काळात चप्पल फेकून मारली असल्याचा खळबळजनक खुलासा कंगनाची बहिण रंगोलीनं केला आहे.
महेश भट्टनं कंगनाला फेकून मारली होती चप्पल, बहिण रंगोलीचा खुलासा - mahesh bhatt
महेश भट्ट यांनी नव्हे तर अनुराग बासू यांनी कंगनाला ब्रेक दिला आहे. महेश भट्ट या चित्रपटात केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते
![महेश भट्टनं कंगनाला फेकून मारली होती चप्पल, बहिण रंगोलीचा खुलासा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3027846-thumbnail-3x2-kan.jpg)
कंगनाने गेल्या काही दिवसांपासून आलियाला चांगलेच टोला लगवायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या मुलीच्या बाजूने बोलत आलियाची आई सोनी राजदान यांनी कंगनाला महेश भट्ट यांनीच चित्रपटसृष्टीत संधी दिली, तरीही ती सतत आमच्या कुटुंबीयांवर टीका का करते हेच समजत नसल्याचे म्हटले. सोनी राजदान यांच्या या ट्विटवर उत्तर देत कंगनाची बहिण रंगोलीने खळबळजनक खुलासा केला.
प्रिय सोनीजी, महेश भट्ट यांनी नव्हे तर अनुराग बासू यांनी कंगनाला ब्रेक दिला आहे. महेश भट्ट या चित्रपटात केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. इतकंच नव्हे तर त्यांच्या ‘धोखा’ चित्रपटात काम करण्यास कंगनाने नकार दिला होता. ज्यानंतर संतापलेल्या महेश भट्ट यांनी तिला बरेच काही सुनावले आणि ‘लम्हे’च्या प्रिव्यूदरम्यान महेश भट यांनी १९ वर्षांच्या कंगनाला चप्पल फेकून मारली होती. त्यांनी कंगनाला तिचाच चित्रपट पाहू दिला नव्हता. यानंतर माझी बहीण रात्रभर रडली होती, असे रंगोलीनं पुढे म्हटले आहे.