मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगन रनौत सध्या तिच्या आगामी 'थलायवी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती जयललीता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कंगनाने तब्बल २० किलो वजन वाढवले आहे. कंगनाची बहीण रंगोली चंडेलने कंगनाचे काही फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
'थलायवी' चित्रपटानंतर कंगना 'तेजस' आणि 'धाकड' यांसारख्या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातही तिची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. रंगोलीने कंगनाचे काही जुने फोटो देखील शेअर केले आहे. या जुन्या फोटोंमध्ये कंगनाचा स्लिम अवतार पाहायला मिळतो. तर, आता वाढलेल्या वजनासह देखील तिचा लुक समोर आला आहे.
हेही वाचा -'अंग्रेजी मेडियम' नव्या गाण्यावर थिरकल्या आलिया, कॅटरिना, अनुष्का, जान्हवीसह दिग्गज अभिनेत्री