मुंबई -काही दिवसांपासून कंगनाची बहीण रंगोली चंडेल विषयी बरीच चर्चा रंगली आहे. फराह खानच्या तक्रारीनंतर रंगोलीचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. फराह खानच्या म्हणण्यानुसार रंगोलीने आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे टि्वटरकडे तिची तक्रार केली होती. या सर्व वादानंतर आता अभिनेत्री कंगना रनौत आपल्या बहिणीची पाठराखण करण्यासाठी पुढे आली आहे.
...तर आम्ही माफी मागू, बहिणीची पाठराखण करण्यासाठी कंगनाचा पुढाकार
कंगनाच्या टीमकडून सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओ मध्ये तिने रंगोलीची बाजू मांडली आहे.
कंगनाच्या टीमकडून सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओ मध्ये तिने रंगोलीची बाजू मांडली आहे. 'रंगोलीच्या ट्विटमध्ये कुठेही मुस्लीम विरोधी विधान असेल तर, मी आणि रंगोली दोघीही सर्वांची माफी मागण्यासाठी तयार आहोत. रंगोलीने आपल्या ट्विट मध्ये लिहिलं होतं की, डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना गोळी मारली पाहिजे. मात्र, तिला हे माहिती नाही की त्यांच्यावर कोणी हल्ला केला होता. आपल्या ट्विट मधून तिने कोणत्याही विशिष्ट समुदायाचे नाव घेतले नाही. त्यामुळे फराह खानने तिच्याविरोधात केलेली तक्रार चुकीची आहे', असे स्पष्टीकरण कंगनाने आपल्या व्हिडिओतून दिले आहे.
याशिवाय तिने असेही म्हटले, की या देशात तुम्ही पंतप्रधान, गृहमंत्री यांना अतिरेकी म्हणू शकता परंतू अतिरेक्यांना अतिरेकी म्हणता येत नाही. देशात राहून देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील कंगनाने आपल्या व्हिडीओतून केली आहे.