महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'फेयर अँड लव्हली' क्रीमचे नाव बदलणार, 'फेयर' शब्द हटवण्याने सुटणार का प्रश्न? - 'फेयर' शब्द हटवण्याने सुटणार का प्रश्न?

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने घोषणा केली आहे की ते 'फेयर अँड लव्हली' क्रीमचे नाव आता बदलणार आहेत. या उत्पादनाचे आता री-ब्रँडिंग करणार आहेत. यातून फेयर हा शब्द हटवण्यात येणार आहे. याला सर्व क्षेत्रातून प्रतिसाद मिळत आहे.

name of the cream 'Fair and Lovely' will be changed
'फेयर अँड लव्हली' क्रीमचे नाव बदलणार

By

Published : Jun 26, 2020, 8:34 PM IST

मुंबई - काही वर्षांपासून तथाकथित सुंदरतेचे प्रतिक समजली जाणारी आणि गोरेपणाच्या भावनेला प्रोत्साहन देणाऱ्या 'फेयर अँड लव्हली' क्रीमचे नाव आता बदलण्यात येणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने आपल्या या ब्युटीब्रँडच्या नावातून 'फेयर' हा शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचे सर्व क्षेत्रातून आणि समुदायातून स्वागत होत आहे. बॉलिवूड सेलेब्रिटीजनीही याला पाठिंबा दर्शवला आहे. याला समर्थन देताना अभिनेत्री कंगना रनौतने म्हटले आहे, "ही लांबलचक आणि कधी कधी एकट्याने लढवली गेलेली लढाई आहे. परंतु परिणाम तेव्हाच होतो जेव्हा संपूर्ण देश यात सहभाग घेतो."

आपल्या त्वचेच्या रंगामुळे पक्षपाताचा संघर्ष केलेल्या सुहाना खानने या पावलांचे कौतुक केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर ब्रँडच्या घोषणेचा पुनुरुच्चार करणाऱ्या पोस्टला शेअर करीत लिहिलंय, "हिंदुस्थान युनिलिव्हरने घोषणा केली आहे की, ते आपल्या त्वचा उजळ करण्याच्या 'फेयर अँड लव्हली' क्रीमचे री-ब्रँडिंग करणार आहे आणि उत्पादनाच्या नावातून फेयर हा शब्द हटवणार आहे."

बिपाशा बसूने आपल्या त्वचेच्या रंगाबद्दल एक पॉवरफुल्ल निवेदन शेअर केले आहे.

अभय देओलने ही एक चांगली सुरूवात असल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्री रिचा चढ्ढाने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलंय, "भारतासारखेच अशी अनेक राष्ट्र आहेत जिथे इंग्रजांनी राज्य केले. अशा देशामध्ये गुलामी एका मानसिक रुपातून धारण करीत असते. आम्हाला वाटायाला लागते की आपला रंग, आपली भाषा, आपले जेवण चांगले नाहीय...आणि हे इंग्रज आम्हाला सतत सांगतही आले होते....दुर्दैवाने या गोष्टी हीन समजून त्या बदलण्याचा प्रयत्न करीत असतो. लहानपणापासून आपल्याला शिकवले जाते की गोरां रंग म्हणजे सुंदर. पूर्वी सिनेमाची गाणीही असायची, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है...असे गाणे आजच्या तारखेला बनू शकते? सर्व गोष्टी बदलायला वेळ लागतो. आपल्या रंगावर आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्या पोस्टसोबत रिचाने एक फोटोही शेअर केलाय. यात ती टीशर्टमध्ये दिसत आहे. यात लिहिलंय, नॉट फेयर बट लव्हली."

हेही वाचा - सुशांतचे सोशल मीडिया अकाऊंट कोण चालवत आहे? 'महाभारत' फेम रुपा गांगुलींचा गंभीर आरोप

एचयूएलने आपल्या निवेदनात लिहिलंय, "गेल्या एका दशकात फेयर अँड लव्हलीने महिला सशक्तीकरणाला संदेश दिला. ब्रँडचा दृष्टीकोन सुंदरतेबद्दलची समग्र दृष्टी बदलण्याचा आहे." याशिवाय एचयूएलने फेयर अँड लव्हलीच्या पॅकेजवरुन 'फेयर/फेयरनेस' 'व्हाइट/व्हाइटनिंग' आणि 'लाइट/लाइटनिंग' असे शब्दही हटवले आहेत. आता एचयूएल नव्या नावाला मंजूरी मिळण्यासाठी प्रशासनाकडून प्रतीक्षा करीत आहे. पुढच्या काही महिन्यात नाव बदलण्याची अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details