महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कंगना ऑनस्क्रीनही बनणार सच्ची देशभक्त, 'तेजस' सिनेमात करणार महिला वैमानिकाची भूमिका - Kangana Ranaut

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'च्या अभूतपूर्व यशानंतर आरएसवीपीचा वायु सेनेवरील आगामी चित्रपट 'तेजस' या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. कंगना रनौत अभिनीत 'तेजस' एक साहसी आणि निडर फाइटर पायलटची कहाणी आहे.

Tejas
'तेजस'

By

Published : Aug 31, 2020, 1:32 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रानौत रोजच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून खळबळजनक आरोप करत असते. मात्र आता याच कंगनाला सिल्व्हर स्क्रीनवर खरी देशभक्त बनण्याची संधी मिळाली आहे.

गतवर्षी रिलीज झालेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'च्या अभूतपूर्व यशानंतर आरएसवीपीचा वायु सेनेवरील आगामी चित्रपट 'तेजस' या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाद्वारे भारतीय सैन्यदलाने करून दाखवलेली पराक्रमाची कथाप्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. कंगना रनौत अभिनीत 'तेजस' एक साहसी आणि निडर फाइटर पायलटची कहाणी आहे. 2016 मध्ये भारतीय वायु सेना महिलांना प्रत्यक्ष युद्ध भूमिकेत सहभागी करणारी देशातील पहलीच सुरक्षा सेना होती आणि हा चित्रपट याच ऐतिहासिक घटनेने प्रेरित आहे.

या सिनेमाबद्दल बोलताना कंगना म्हणते की, “तेजस एक सविस्तरपणे सांगितलेली कहाणी आहे, ज्यात मला वायु सेनेच्या पायलटची भूमिका निभावण्याचे सौभाग्य मिळाले आहे. आशा विषयावर आधारित सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याबाबत मी स्वतःला फारच भाग्यवान समजते. ज्या सैन्यात गणवेषातील प्रत्येक पराक्रमी पुरुष आणि महिलेला सलाम केला जातो, आणि ज्या सैन्यात प्रत्येक सैनिक प्रत्येक क्षणी आपल्या कर्तव्यासाठी बलिदान द्यायला तयार असतो आशा भारतीय सैन्याच चित्रण सिनेमात करणं खरच फार खास आहे. या चित्रपटात सशस्त्र दल आणि यातील लढवयांचा सन्मान करण्यात आला आहे. या सिनेमासाठी मी फारच एक्सायटेड आहे.

सर्वेश मेवाडाद्वारे याने या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन करणार असून येत्या डिसेंबर महिन्यात या सिनेमाच्या प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात होईल. या सिनेमाद्वारे देशाच्या सशस्त्र दलांना सलाम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सिनेमाचे निर्माते रोनी स्क्रूवाला यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details