महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कंगनाला दररोज सकाळी येते मुंबईतील 'या' गोष्टीची आठवण - कंगना रणौत इन्स्टाग्राम

अभिनेत्री कंगना रणौतला मुंबईतील रेसकोर्सवरील घोडेस्वारीची आठवण येते. कंगनाने तिच्या घोडेस्वारीचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Kangana Ranaut
कंगना रणौत

By

Published : Nov 3, 2020, 2:20 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या घरी मुक्कामाला आहे. रोज झोपेतून उठल्यानंतर तिला मुंबईतील घोडेस्वारीची आठवण येत असल्याचे तिने म्हटलंय. कंगनाने तिच्या घोडेस्वारीचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या छायाचित्रांसह अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मुंबईतील रेसकोर्सवरील घोडेस्वारीची प्रत्येक सकाळी मला आठवण येते. मी काही क्रीडापटू नाही, पण माझे घोड्यासोबत जिव्हाळ्याचे नाते तयार झालंय, कारण तो एक आनंददायक अनुभव आहे.''

कंगना सध्या तिच्या गावी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. लॉकडाऊन झाल्यापासून ती तेथे आहे आणि तिच्या कुटुंबासमवेत खूप चांगला वेळ घालवत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details