मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या संग्रामात भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स चांगला राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांसोबत बॉलिवूड जगतानेही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत जल्लोष केला. यात बॉलिवूड क्विन कंगना मागे कशी राहिल ? मोदींचा विजय तिने अनख्या पध्दतीने साजरा केला. तिने घरी पार्टी आयोजित केली होती. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मोदींच्या विजयानंतर कंगना रानावतने बनवले 'पकोडे', फोटो व्हायरल - 2019 election
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा जल्लोष कंगना रानावतने अनोख्या पध्दतीने साजरा केला. तिने आपल्या घरीच काही लोकांसाठी पार्टी ठेवली होती. चहा पकोडेच्या या पार्टीसाठी तिने स्वतः किचनमध्ये मेहनत घेतली.
कंगनाच्या घरी झालेल्या पार्टीचे फोटो तिची बहिण रंगोली चंदेल यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "कंगना जेव्हा जेव्हा खूश असते फक्त तेव्हाच खाद्यपदार्थ बनवते. आज नरेंद्र मोदी यांच्या विजयाबद्दल आनंदित होऊन पार्टी दिली. जय हिंद, जय भारत." रंगोलीच्या या ट्विटवरुन लक्षात येते की, मोदींच्या विजयमुळे कंगना किती खूश झाली आहे.
कंगना रानावत शिवाय बॉलिवूडच्या विवेक ओबेरॉय, पायल रोहतगी आणि शिल्पा शेट्टी यांना मोदींच्या विजयाचा आनंद झालाय. त्यांनी आपल्या पध्दतीने मोदींना अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्यात.