मुंबई - एनसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील कलाकार आर्यनच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत. गुरूवारी बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनने माय डियर आर्यन खान, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे, अशी स्टोरी शेअर केली होती. त्याची ही पोस्ट प्रसिध्द झाल्यानंतर लगेचच अभिनेत्री कंगना रणौतने ह्रतिकवर टीका करणारी पोस्ट लिहिली आहे.
ह्रतिकचे आर्यन खानला समर्थन ह्रतिकचे आर्यन खानला समर्थन
हृतिक रोशनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भली मोठी पोस्ट लिहित आर्यनचा फोटो शेअर केला होता. 'प्रिय आर्यन आयुष्य एक खूपच विचित्र प्रवास आहे. मात्र ते उत्कृष्टसुद्धा आहे.कारण ते अनिश्चित आहे. एखाद्या हिरोला यातून बाहेर पाडण्यासाठी यासर्व गोष्टींची आवश्यकता असतेच. असे हृतिक म्हणत आर्यनला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्रतिकवर टीका करणारी कंगनाची पोस्ट
ह्रतिकवर टीका करणारी कंगनाची पोस्ट सध्या ह्रतिकची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आर्यनचे समर्थन करणाऱ्यासाठी पुढे आलेल्या कलाकारांसाठी कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीवर म्हटले आहे की... "आता सर्व माफिया पप्पू आर्यनच्या बचावासाठी पुढे येत आहेत...आम्ही चुका करतो परंतु चुंकाचे उद्दात्तीकरण करता कामा नये. मला माहिती आहे यातून त्याला कळून येईल आणि आपल्या कामात परिणामांची जाणीव होईल...आशा करते तो यातून शिकेल, चांगला बनेल आणि शिकून सावरेल..जर एकादा नाजूक स्थितीत असे तर त्याच्याबद्दल गॉसिप केली जाऊ नयेत तर त्याने चुक केलेली नाही तर गुन्हा केलाय याची त्याला जाणीव झाली पाहिजे."
हेही वाचा - हृतिक रोशनने आर्यन खानसाठी लिहिली पोस्ट : देव कणखर व्यक्तींची परीक्षा घेत असतो