महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Kangana Ranaut angry : कंगना रणौतचा तीळ पापड, म्हणाली "कृषी कायदे रद्दचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद" - Kangana Ranaut angry

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सकाळी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत अनेक राजकीय पक्ष करीत असताना भाजपची समर्थक असलेल्या कंगना रणौतला मात्र मोदींचा हा निर्णय पटलेला नाही. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हणत कंगनाने मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे

कंगना रणौतचा तीळ पापड
कंगना रणौतचा तीळ पापड

By

Published : Nov 19, 2021, 1:09 PM IST

Updated : Nov 19, 2021, 1:16 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सकाळी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत अनेक राजकीय पक्ष करीत असताना भाजपची समर्थक असलेल्या कंगना रणौतला मात्र मोदींचा हा निर्णय पटलेला नाही. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हणत कंगनाने मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. तीनही शेतकरी कायदे रद्द करा या मागणीसाठी देशभरातील शेतकरी गेली 1 वर्षे आंदोलन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली.

कंगनाचा तीळ पापड

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "दुःखद आणि लज्जास्पद ...संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या ऐवजी रस्त्यावरील लोक जर कायदे करु लागले तर ते राष्ट्र जिहादी आहे. ज्यांना जे पाहिजे होते त्यांना ते मिळाले त्यांचे अभिनंदन."

शेतकरी कायदे रद्द झाल्याने कंगना नाराज

कृषी कायदे मागे घेण्याची मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा विरोध होत असलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना या कायद्याबद्दल समजून सांगण्यात कमी पडलो, त्या बद्दल देशाची माफी मागतो.

कृषी कायद्याच्या विरोधात कंगना रणौत सुरुवातीपासून राहिली आहे. या आंदोलनातील शेतकऱ्यांबाबत तिने अनेक मुद्दे सोशल मीडियातून व्याक्त केले होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या रोषालाही ती सामोरी गेली होती. शेतकी आंदोलक नकली असल्याची ती सतत म्हणत होती. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माघार घेतल्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ असलेल्या व शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्या कंगनासारख्यांची गोची झाली आहे.

शेतकरी कायदे रद्द झाल्याने कंगना नाराज

कंगना रणौतने सरकारच्या कायदे आणण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. अनेकदा शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या दिलजीत दोसांझसारख्या इतर सेलिब्रिटींवर कंगनाने जोरदार टीका केली होती. शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या रिहानाबद्दलही कंगनाने ट्विट केले होते.

हेही वाचा - PM Modi Address To Nation : तीनही कृषीकायदे रद्द होणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

Last Updated : Nov 19, 2021, 1:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details