महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अपराजित अयोध्या'चे दिग्दर्शन करणार कंगना, राम मंदिर वादावर आधारित आहे चित्रपट - के. व्ही विजयेंद्र प्रसाद

कंगना रानौत पुन्हा एकदा दिग्दर्शनासाठी सज्ज झाली आहे. 'अपराजित अयोध्या' या चित्रपटाचे दिग्दर्शन ती करणार आहे. राम मंदिर विवादावर आधारित हा चित्रपट आहे.

Kangana Ranaut
कंगना रानौत

By

Published : Jun 8, 2020, 3:10 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रानौत आगामी 'अपराजित अयोध्या' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. राम मंदिर वादावर आधारित हा चित्रपट असेल.

कंगना म्हणाली, ''मी चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरले नव्हते. याच्या संकल्पनेवर मी काम सुरू केले होते. मी या चित्रपटाची निर्मिती करणार होते आणि याचे दिग्दर्शन दुसऱ्या कोणाकडून तरी करणार होते.''

ती पुढे म्हणाली, ''लेखक के. व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी सिनेमाची स्क्रिप्ट तयार केली, तो एक मोठ्या कॅनव्हॉसवर सेट केलेला चित्रपट आहे. काही प्रमाणात ऐतिहासिक चित्रपटासारखा, ज्याचे दिग्दर्शन मी यापूर्वी केले होते. माझ्या सहकाऱ्यांनाही वाटत होते की याचे दिग्दर्शन मी केले तर बरे होईल. त्यामुळे हे सर्व असे ठरले.''

के. व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे लेखन केले होते. सुरूवातीला हा चित्रपट दाक्षिणात्य दिग्दर्शक क्रिश यांनी केले होते. त्यानंतर याच्या दिग्दर्शनाची धुरा कंगनाने सांभाळली होती. त्यावेळी क्रिशने दावा केला होता की, संपूर्ण चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यातील काही सीन्सचे पॅचवर्क बाकी होते. निर्मात्याच्या आग्रहाने हे सीन्स करायला त्याने कंगनाला परवानगी दिली होती. मात्र कंगना साकारत असलेल्या झांसीच्या राणीपेक्षा खलनायकाचे सीन्स जास्त पॉवरफुल्ल झाल्याचे कंगनाला वाटले आणि तिने मूळ सिनेमाच्या सीन्समध्ये बरेच बदल केले होते. यावर क्रिश नाराज झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details