मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) आपल्या फाजील बडबडीने सध्या प्रकाश झोतात आली आहे. कंगना रणौत जाणून-बुजून अशा पद्धतीची वक्तव्य करून प्रसारमाध्यमांसाठी आकर्षण ठरत आहे. परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi)यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अपमान कंगना रणौत करत आहे, असे सांगत, कंगणाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole)यांनी केली आहे.
कंगना प्रश्नावर भाजपची चुप्पी का? (Why BJP's silence on Kangana question?)
कंगना वारंवार देश व देशातील महान नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करत आहे. विवादावर पडदा टाकण्याऐवजी कंगना एखाद नवीन विधान करून तो विवाद अजून भडकवत आहे. कंगनाच्या या प्रवृत्तीला भाजपच समर्थन असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. कंगनाने आता राष्ट्रपित्याचा ही अपमान केला आहे तरी भाजपने अजूनही याबाबत चुप्पी साधलेली आहे. भाजपने याबाबत आपले स्पष्टीकरण करावे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.