मुंबई (महाराष्ट्र): अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut)बुधवारी तिच्या सोशल मीडिया हँडलवर, भारतीय राज्य आणि शेतकर्यांविरोधात देशद्रोही विधान केल्याबद्दल श्री गुरु सिंग सभा गुरुद्वारा समिती (SGSSGC) द्वारे तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरवर प्रतिक्रिया म्हणून एक पोस्ट शेअर केली आहे.
तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने स्वत:चा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती हातात वाइन ग्लास धरून विचीत्र उत्तेजक ड्रेस परिधान केलेली दिसते.
फोटोसोबत तिने लिहिलंय, "दुसऱ्या दिवशी आणखी एक एफआयआर... जर ते मला अटक करायला आले तर... घरातील मूड," त्यात तिने लाल हृदयाचे इमोटिकॉन जोडले आहे.
19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया देत मोदींचा हा निर्ण आवडला नसल्याचे म्हटले होते.
कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी टीव्हीवरुन राष्ट्राला कळवल्यानंतर, अलीकडीच पद्मश्री पुरस्कार विजेत्या कंगनाने भारताला "जिहादी राष्ट्र" म्हणून संबोधत केले होते