महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जेएनयू हिंसेबाबत कंगनाने सोडले मौन: म्हणते, 'हा राष्ट्रीय मुद्दा बनवू नका'! - Kangana Ranauton JNU issue

संपूर्ण देश जेएनयू हिंसेच्या निमित्ताने दोन मतांमध्ये विभागला गेलाय. लोकांनी हा मुद्दा राष्ट्रीय बनवू नये असे मत कंगना रानावतने व्यक्त केलं आहे.

Kangana Ranaut
कंगना रानावत

By

Published : Jan 10, 2020, 6:55 PM IST


मुंबई - अभिनेत्री कंगना रानावतने जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसेबद्दल आपले मत व्यक्त करीत यावरचे मौन सोडले आहे. ही घटना राष्ट्रीय किंवा राजकीय मुद्दा बनू नये, असे तिने म्हटलंय.

'पंगा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बोलताना कंगना म्हणाली, ''जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा शोध सुरू आहे. हे समजून घ्यायला पाहिजे की, तिथे जेएनयूमध्ये अभाविप आणि इतर असे दोन गट आहेत.''

ती पुढे म्हणाली, ''कॉलेज आयुष्यात गँगवॉर ही सामान्य गोष्ट आहे. मी मुलींच्या होस्टेलमध्ये राहात होते, तेव्हा बाजूलाच मुलांचे होस्टेल होत. तिथे दिवसाढवळ्या खुनाचा प्रयत्न झाला होता. एका मुलाने आमच्या होस्टेलमध्ये प्रवेश केला आणि त्याला जमावाने मारहाण केली, मात्र आमच्या होस्टेल मॅनेजरने त्याला वाचवले.''

कंगना पुढे म्हणाली, ''हे गँगवॉर डेंजरस लोक घडवून आणत असतात. ज्याचा दोन्ही गटांना त्रास होतो. अशा घटनांचा राष्ट्रीय मुद्दा बनता कामा नये.''

''पोलिसांनी त्यांना कस्टडीत घ्यावे आणि चार कानफडीत लावून चौकशी करावी. अशा प्रकारचे लोक रस्त्यावर, कॉलेजमध्ये सर्वत्र भेटतात. त्यांचा राष्ट्रीय मुद्दा करु नये कारण ते त्या लायकीचे नाहीत'', असेही कंगना म्हणाली.

५ जानेवारी रोजी जेएनयू कँपसमध्ये काही अज्ञात बुरखाधारी गुंडांनी घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती. यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details