मुंबई- अभिनेत्री कंगना रनौत पत्रकारांसोबतच्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. यानंतर आता कंगनाच्या आगामी चित्रपटाबद्दलचे एक वृत्त समोर आले आहे. कंगना लवकरच 'धाकड' चित्रपट झळकणार असून हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे.
'धाकड'मध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार कंगना - manikarnika
एका मुलाखतीदरम्यान कंगना म्हणाली, मणिकर्णिकाच्या यशानंतर हे सिद्ध झालं, की लोक महिला केंद्रित चित्रपटांना अधिक पसंती दर्शवत आहेत. 'धाकड' हा असाच सिनेमा असून तो भारतीय सिनेमासाठी एक महत्त्वपूर्ण बदल असणार आहे.
आता या चित्रपटातील कंगनाच्या पात्राविषयीची माहिती समोर आली आहे. सिनेमात कंगना गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका मुलाखतीदरम्यान कंगना म्हणाली, मणिकर्णिकाच्या यशानंतर हे सिद्ध झालं, की लोक महिला केंद्रित चित्रपटांना अधिक पसंती दर्शवत आहेत. 'धाकड' हा असाच सिनेमा असून तो भारतीय सिनेमासाठी एक महत्त्वपूर्ण बदल असणार आहे.
हा एक महिलाप्रधान अॅक्शन चित्रपट असणार आहे. जर हा चित्रपट यशस्वी झाला तर भारतीय सिनेजगतात महिलांना मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही, असा विश्वास कंगनाने व्यक्त केला. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीश घई करणार असून २०२० मध्ये दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.