मनाली -कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशभरात सध्या लॉक डाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे अभिनेत्री कंगना रनौतदेखील आपल्या कुटुंबीयासोबत मनाली येथे वेळ घालवत आहे.
Lockdown : लॉक डाऊनमध्ये कंगना 'असा' घालवतेय वेळ, शेअर केला फोटो - kangna ranaut latest news
कंगना आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मानली येथे आपल्या घरी गेली होती. दरम्यान लॉक डाऊन झाल्यामुळे ती सध्या मनालीतच कुटुंबासोबत राहत आहे.

कंगना रनौत
रिकाम्या वेळेत कंगनाने आपल्या आईकडून केसांना तेलाची मालिश करून घेतली. कंगनाची बहीण रंगोली चंडेलने कंगना आणि तिची आई आशा रनौत सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.