महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'धाकड' कंगना रानावतचा आक्रमक अवतार

कंगना रानावत धाकड या आगामी चित्रपटातून नव्या अवतारात झळकणार आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून पुढील वर्षी दिवळीत हा चित्रपट रिलीज होईल.

धाकड

By

Published : Jul 9, 2019, 11:54 AM IST

मुंबई - कंगना रानावतची प्रमुख भूमिका असलेल्या धाकड चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. पुढील वर्षीच्या दिवाळीत मुख्य आकर्षण ठरू शकेल, अशा या चित्रपटात कंगना धाकड अवतारात दिसणार आहे.

पोस्टरवरील कंगनाच्या दोन्ही हातात मशीनगन असून ती शत्रूवर तुटून पडलेली दिसते. तिचे हे आक्रमक रूप चाहत्यांसाठी आश्वासक वाटत आहे. या चित्रपटाचे रजनीश रेझी घई यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून सोहेल मकलई याचे निर्माते आहेत. पुढील वर्षाच्या सुरूवातीला या चित्रपटाचे शूटींग सुरू होईल आणि दिवाळीत धकड प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details