महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तालिबानबद्दलच्या पोस्टनंतर इन्स्टाग्राम हॅक, आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा कंगनाचा दावा - Kangana Ranaut's reaction to the Taliban

कंगना रणौतने तिच्या नवीन पोस्टमध्ये सांगितले आहे की तिचे इन्स्टाग्राम अकाउंट काल रात्री हॅक करण्यात आले आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. कंगनाने याला आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचेही म्हटले आहे. तालिबानींवर पोस्ट टाकल्यानंतर हे सर्व घडल्याचे कंगना सांगते.

कंगना रणौत
कंगना रणौत

By

Published : Aug 18, 2021, 10:07 PM IST

मुंबई - सतत बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहणारी अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने तिच्या नवीन पोस्टमध्ये सांगितले आहे की तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे (Kangana Ranaut Instagram Account Hacked) काल रात्री कंगनाने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. कंगनाने याला आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचेही म्हटले आहे. तालिबानींवर पोस्ट टाकल्यानंतर हे सर्व घडल्याचे ती सांगते.

काय लिहिलंय कंगनाने

इन्स्टा स्टोरी पोस्टवर तिचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती देताना कंगनाने लिहिले, 'मला काल रात्री इन्स्टाग्राम अॅलर्ट मिळाला की चीनमधून कोणीतरी माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.

कंगना रणौतची पोस्ट

मग अचानक अलर्ट गेला आणि आज सकाळी तालिबान बद्दलच्या माझ्या सगळ्या स्टोरीज गायब झाल्या, माझे खाते देखील बंद झाले. जेव्हा मी इन्स्टाग्राम स्टाफला फोन केला, तेव्हा त्यांनी मला पुन्हा एक्सेस मिळाला, पण मी काहीही लिहू शकत नाही. मी लिहिण्याचा प्रयत्न केल्यास, खाते आपोआप लॉग आउट होत आहे. मला ही पोस्ट लिहिण्यासाठी माझ्या बहिणीचा फोन घ्यावा लागला, कारण माझे खाते तिच्या फोनमध्येही खुले आहे. हे एक मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्यासारखे वाटते.

तालिबानवर कंगना रणौतने दिली होती प्रतिक्रिया

अफगाणिस्तानवर तालिबाने कब्जा केल्याचा ब्रेकिंग न्यूजचा फोटो पोस्ट करत कंगनाने लिहिले, 'आज आम्ही हे शांतपणे पाहत आहोत, उद्या हे आपल्यासोबतही घडू शकते', भारत सरकारने अफगाणीस्तानातील सर्व हिंदूंना भारतात आणावे, याबद्दल तिने पुढे लिहिले होते की, ''मी CAA साठी संघर्ष केला होता ते बरे झाले. मला संपूर्ण जगाला वाचावायचे आहे पंतु याची सुरुवात मला माझ्या घरापासून करायची आहे.''

कंगनाने अफगाणीस्तानसाठी प्रार्थना केली होती. कंगनाने तिच्या पुढील पोस्टमध्ये लिहिले होते, ''होय, हे नाकारता येणार नाही की अफगाणिस्तानला आपली गरज आहे. जे नाटकी लोक पॅलेस्टिनी मुस्लीम लोकांसाठी अश्रू ढाळत होते, ते आता अफगाण मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायानंतर गप्प आहेत. मी भारत सरकारचे आभार मानते की त्यांनी सीएए आणून हिंदू, सिख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी आणि शेजारच्या मुस्लीम देशातील लोकांना निवासस्थान मिळू शकेल अशी आशा दाखवली आहे. आज आम्ही अफगाणीस्तानला वाचवू शकतो परंतु याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. मी अफगाणीस्तानसाठी प्रार्थना करते.''

हेही वाचा - विकी कौशलसोबत एंगेजमेंट? वधूच्या वेषातील 'कॅटरिना'च्या फोटोंमुळे कन्फ्यूजन वाढले

ABOUT THE AUTHOR

...view details