मुंबई - बॉलिवूड क्विन कंगनाने स्वतःची निर्मिती संस्था स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते. आपल्याला जसा हवाय तसा सिनेमा बनवण्यासाठी याची आवश्यकता तिला वाटत होती. तिचे हे स्वप्न आता सत्यात उतरले असून 'मणिकर्णिका' या बॅनरखाली ती सिनेमा बनवणार आहे.
कंगनाची बहिण रंगोली हिने प्रॉडक्शन हाऊसच्या उद्घाटनानिमित्य केलेल्या पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''आज आम्ही कंगनाच्या मणिकर्णिका प्रॉडक्शन हाऊसचे उद्घाटन केले. कंगना निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आणि अक्षयत कायदा आणि वित्त विभाग सांभाळेल. त्याने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून फिल्म प्रॉडक्शनचे शिक्षण घेतलंय.''
कंगना राणावत आगामी पंगा या चित्रपटात झळकणार आहे. अलिकडे याच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. यात जस्सी गिलची प्रमुख भूमिका आहे.