मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या दररोज एक ट्विट करून खळबळ उडवून देत आहे. मुंबईला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर संबोधल्याने मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र सध्या तयार झाले आहे. मुंबई महापालिकेकडून कंगणाचे पाली हिल स्थित कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत तोड काम करण्यात आल्यानंतर कंगनाने तीन व्हिडिओ टि्वट करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. 'तुमने जो किया अच्छा किया उद्धव ठाकरे,आज मेरा घर टुटा है, कल तुम्हारा घमंड टुटेगा', असे तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
'आज मेरा घर टुटा है, कल तुम्हारा घमंड टुटेगा', कंगनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - kangana ranaut on property demolition
महापालिकेकडून कंगनाचे पाली हिल स्थित कार्यालय तोडण्यात आल्यानंतर तिने व्हिडिओ टि्वट करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'तुमने जो किया अच्छा किया उद्धव ठाकरे,आज मेरा घर टुटा है, कल तुम्हारा घमंड टुटेगा', असे तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
'कंगनाने मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. तिने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. 'उद्धव ठाकरे आज फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडलं आहे. हे वेळेच चक्र असून उद्या तुमचं गर्वहरण होईल, हे लक्षात ठेवा. माझे घर पाडून तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. आज मला काश्मिरी पंडितांना काय वाटलं असले, हे कळत आहे. मी फक्त अयोध्यावरच नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार आहे. देशवासियांना जागरूक करणार आहे. माझ्यासोबत झालेल्या या क्रुरतेचा आणि दहशतवादाचा काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र' असे कंगनाने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात उडी घेऊन व मुंबईवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेली अभिनेत्री कंगनाला केंद्र सरकारने 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. तिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं होतं. वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्या दिल्या जात आहेत, असं सांगितले होते. तसंच आपण 9 तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानही दिले होते. यानंतर बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली आहे. ती मुंबईत दाखल होण्यापूर्वीच तीच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेचे पथक दाखल झाले आणि कार्यालय तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, या कारवाईच्या विरोधात कंगनाच्या वकिलाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. त्यावर महानगरपालिकेने आपली कारवाई थांबवावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच यासंदर्भात उत्तर देण्यासाठी पालिकेला गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.