मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये भूकंप आला आहे. इंडस्ट्रीतून अनेक प्रकारच्या गोष्टी उघड होताना दिसत आहेत. प्रस्थापित निर्मात्यांवर प्रचंड आरोप केले जात आहेत. अभिनेत्री कंगना रानावतने पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करुन सुशांतच्या आत्महत्येवर प्रश्न चिन्ह उभे केले आहेत.
कंगनाने सुशांतचे वडील व अंकिता लोखंडे तसेच अभिषेक कपूर यांच्या विधानांचा उल्लेख करीत सुशांतला कशा प्रकारे त्रास दिला जात होता याचा पाढा वाचलाय. त्यासोबत छापून आलेल्या बातम्यांचा दाखला देत वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसनी त्याला कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला याबद्दलही सांगितलंय. तिलाही कशा प्रकारे त्रास दिला जातोय याबद्दलही ती यात बोलली आहे.