मुंबई- कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे गेली सात महिने कंगना रणौत शूटिंगच्या सेटपासून दूर होती. आता ती पुन्हा कामावर परतत असून 'थलायवी' या बायोपिकच्या शूटिंगमध्ये ती भाग घेणार आहे. तिने सोशल मीडियावर आपले नुकतेच क्लिक केलेले काही फोटो शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. थलायवीच्या शूटिंगसाठी ती दक्षिण भारताच्या दौऱ्यावर जात आहे.
''प्रिय मित्रांनो, आज खूप खास दिवस आहे. सात महिन्यानंतर पुन्हा कामाला सुरूवात करीत आहे. माझ्या बहुभाषिक थलायवी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या या कठीण काळात तुमच्या आशिर्वादाची मला गरज आहे'', असे तिने ट्विटरवर लिहिले आहे.