मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक दिग्गजांची चौकशी पोलीस करीत आहेत. याअंतर्गत अभिनेत्री कंगना रनौतची चौकशी होणार असल्याच्या बातमीचे कंगनाच्या टीमने खंडन केले आहे.
या बातमीवर प्रतिक्रिया देताना कंगनाच्या टीमने म्हटलंय, ''मुंबई पोलिसांच्या वतीने कंगनाकडे याबाबतील अशी कोणतीच गोष्ट झालेली नाही. मात्र असे काही असल्यास ती नक्कीच सहकार्य करेल.'' कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बिनधास्त टीका अनेकवेळा केल्या आहेत. यामुळे ती नेहमी चर्चेतही राहिली आहे.