कंगना राणौतने (Kangana Ranau) अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील तिची काही छायाचित्रे पोस्ट करून एक लांबलचक नोट लिहिली आहे. यामध्ये तिने उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या (Kangana threatened to kill) येत असल्याचे सांगितले आहे. कंगनाने ही माहितीही दिली आहे की, तिला धमकी देणाऱ्यांविरोधात एफआयआर लिहिली आहे.
कंगनाने सोनिया गांधी यांना पत्र लिहून (Kangana wrote a letter to Sonia Gandhi )त्यांच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा लोकांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी केली आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर कंगनाने एक पोस्ट केली होती. या पोस्टनंतरच आपल्याला धमक्या येत असल्याचं तिचं म्हणणं आहे.