मुंबई- अभिनेत्री कंगना रानावत सध्या लॉस एंजेलिसमध्ये मुक्कामाला आहे. थलायवी या आगामी चित्रपटाची पूर्वतयारीत ती आहे. यातून वेळ काढत कंगनाने दिवाळी सेलेब्रिशन केले आहे. याचा व्हिडिओ तिच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये कंगना थलायवी टीमसोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहे. काही फोटो आणि व्हिडिओ कंगनाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात बहिण रंगोली आणि थलायवी टीमसोबत कंगना डिनर करताना दिसत आहे. एक छोटी अनारकली फायर क्रॅकरची रोषणाई टेबलवरच करण्यात आल्याचे दिसते. कंगनासाठी दिवळी लवकर आल्याचे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे.
थलयवी हा चित्रपट जयललिता यांचा बायोपिक आहे. यात कंगना माजी मुख्यमंत्री आणि तामिळ अभिनेत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. जयललिता यांचा लूक साकारण्यासाठी कंगना सध्या लॉस ऐंजेलिस येथे गेली आहे. हा लूक साकारण्यासाठी कशाप्रकारे मेहनत घ्यावी लागतेय, याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हॉलिवूडचे सुप्रिद्ध मेकअप आर्टिस्ट जेसन कोलिन्स हे कंगनाच्या लूकवर मेहनत घेत आहेत. त्यांनी यापूर्वी 'कॅप्टन मार्व्हल', 'ब्लेड रनर २०४९' आणि 'हंगर गेम्स' यांसारख्या चित्रपटांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. आता ते जयललिता यांच्या बायोपिकचा लूक तयार करत आहेत.
मैसूर येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. विष्णू इंदुरी आणि शैलेश सिंग हे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.