हैदराबाद- 'थलायवी' हा चित्रपट हिट झाल्यानंतर कंगना रणौत 'द इन्कॉरनेशन: सीता' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात कंगना रणौत सीतेची भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. या चित्रपटात सीतेची भूमिका करिना कपूर करणार अशी चर्चा होती. या चित्रपटासाठी करिनाने 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र ही भूमिका कंगनाला मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता कंगनाला या चित्रपटासाठी मोठी फी दिली जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कंगनाला या चित्रपटासाठी 32 कोटी रुपये फी दिली जाईल. असे झाल्यास कंगना बॉलिवूडची सर्वात महागडी आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनेल. आपल्या माहिती करीता सांगायचे तर कंगना आणि चित्रपट निर्मात्यांकडून या बातमीबाबत कोणतेही विधान आणि पुष्टीकरण करण्यात आलेले नाही. या बातम्या देखील अफवा मानल्या जात आहेत.
त्याचवेळी, केआरके याने या संदर्भात एक ट्विट शेअर केले आहे. यात त्याने कंगना मोठी फी घेत असल्याच्या बातमीचे त्याने खंडन केले आहे.