मुंबई - तमिळनाडू राज्याच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी अभिनेत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित कंगणा रणौत स्टारर चित्रपट थलाईवीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
थलाईवी हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेत रिलीज होणार आहे. कंगणाने आज सोमवारी इन्स्टाग्रामवर रिलीज डेटची घोषणा केली. यासोबत तिने चित्रपटाचा एक पोस्टर देखील पोस्ट केला आहे.
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहलं की, या प्रतिशिष्ठ व्यक्तीची कहाणी केवळ पडद्यावर पाहाण्यालायक आहे. थलाईवी पाहण्यासाठी मार्गस्त व्हा. हा चित्रपट जगातील एक सुपरस्टार प्रविष्टी करण्यास पूर्णपणे तयार आहे. थलाईवी 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात येणार आहे.
दरम्यान, थलाईवी चित्रपटाची निर्मिती विष्णु वर्धन इंदुरी यांनी केली आहे. इंदुरी म्हणाले की, थलाईवी प्रत्येक क्षणाला एक शाश्वत अनुभवासोबत एक व्यापक प्रवासाची माहिती देतो. देशातील चित्रपटगृहे पुन्हा उघडली जाणार आहेत. यामुळे आम्ही खूपच उत्साहित आहोत. कारण प्रेक्षक सिल्वर स्क्रीनवर लीजेंडच्या जीवनाचा भव्य अनुभवाचा आनंद घेऊ शकतील.
थलाईवी दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट आहे. यात त्यांच्या जीवनपटाचा उलगडा केला जाणार आहे. गोथिक एन्टरटेनमेंट आणि स्पिंट फिल्म यांच्या मदतीने विब्री मोशन पिक्चर्स कर्मा मीडिया एन्टरटेनमेंट आणि जी स्टुडियो द्वार यांची निर्मीती करण्यात आली आहे.
हेही वाचा -टॉलिवूड फोटोगॉफर 'असा' करत होता रशियन मॉडेलचा छळ; अलेक्झांड्राच्या मृत्यूचे गूढ उकलेले
हेही वाचा -८.९ रेटिंग्ससह 'शेरशाह' बनला IMDb वरील सर्वात लोकप्रिय ‘ओरिजिनल लँग्वेज’ चित्रपट!