महाराष्ट्र

maharashtra

पालिकेचा हातोडा पडण्याआधी असं होत कंगनाचं 48 कोटींचं कार्यालय...

कंगनाच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी तिचे कार्यालय तोडले आहे. महापालिकेने हातोडा चालवलेलं कंगनाचं मुंबईमधलं ऑफिस हे 48 कोटींचं आहे.

By

Published : Sep 9, 2020, 1:21 PM IST

Published : Sep 9, 2020, 1:21 PM IST

Updated : Sep 9, 2020, 1:47 PM IST

कंगनाचं कार्यालय
कंगनाचं कार्यालय

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या दररोज एक ट्विट करून खळबळ उडवून देत आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधल्याने मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र सध्या तयार झाले आहे. कंगनाच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी तिचे कार्यालय तोडले आहे. महापालिकेने हातोडा चालवलेलं कंगनाचं मुंबईमधलं कार्यालय हे 48 कोटींचं आहे.

कंगनाचे हे प्रॉडक्शन हाऊस मुंबईतील पाली हिल भागात असून ते अतिशय सुंदर आहे. हे कार्यालय तयार करण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली होती. तिच्या कार्यालयातील फर्निचर हे हँडमेड आहे. तिचे कार्यालय हे तीन मजली असून या प्रॉडक्शन हाऊसचे नाव 'मणिकर्णिका फिल्मस्' असे ठेवले आहे. तिचे कार्यालय डिझायनर शबनम गुप्ता यांनी डिझाइन केले होते.

7 स्पटेंबरला कंगनाने आपल्या कार्यालयाचा व्हिडीओ टि्वटवर शेअर केला होता. हे 'मणिकर्णिका फिल्मस्' कार्यालय मी गेल्या 15 वर्षं कष्ट करून उभारले आहे. जेव्हा मी निर्माती बनले, तेव्हा माझं स्वत:च कार्यालय असावं, असं माझं स्वप्न होतं. मात्र, आता हे स्वप्न तुटण्याची वेळ आली आहे, असे तिने टि्वटमध्ये म्हटलं होतं.

Last Updated : Sep 9, 2020, 1:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details