मु़ंबई- गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीवरून अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध सुरू असलेला बदनामीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात कंगनाने दाखल केली आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयात दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद करण्यात आला. एडवोकेट जय भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांची बाजू मांडली तर एडवोकेट सिद्दिकी यांनी कंगना रणौत यांच्या बाजूने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखीव ठेवला असून येत्या 9 सप्टेंबर रोजी न्यायालय आदेश घोषित करणार आहे.