मुंबई- कलाकार बहुतेकदा महागड्या आणि फॅशनेबल कपड्यांना प्राधान्य देत असतात. मात्र, अशात कंगनानं दिलेला एक संदेश तिच्या चाहत्यांची मनं नक्कीच जिंकेल. नुकतीच बॉलिवूडची क्वीन जयपूर विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी कंगनाने केवळ ६०० रूपयांची साडी घातलेली पाहायला मिळाली.
कंगनानी घातली ६०० रुपयांची साडी, बहिणीनं उधळली स्तुती सुमने - ब्रॅन्ड
नेहमी फॅशनेबल कपड्यांमध्ये दिसणाऱ्या कंगनाच्या या साध्या लूकनंही अनेकांची मनं जिंकली. कंगनाची बहिण रंगोलीनं तिचा याच साडीतील एक फोटो शेअर करत, ही साडी खरेदी करण्यामागील कथा सांगितली आहे
नेहमी फॅशनेबल कपड्यांंमध्ये दिसणाऱ्या कंगनाच्या या साध्या लूकनंही अनेकांची मनं जिंकली. कंगनाची बहीण रंगोलीनं तिचा याच साडीतील एक फोटो शेअर करत, ही साडी खरेदी करण्यामागील कथा सांगितली आहे. कंगनाने आज जयपूरकडे प्रवास करताना ६०० रुपयांची साडी घातली. जी तिनं कोलकाता येथून घेतली आहे. एक व्यक्ती इतकं सुंदर कापड असलेली ही साडी केवळ ६०० रुपयात विकत असल्याचं पाहून कंगनाला आश्चर्याचा धक्का बसला आणि हेदेखील तिला समजलं, की आपल्या आजूबाजूचे लोक किती कष्ट करतात आणि यातून त्यांना अगदी कमी पैसे मिळतात, असं रंगोली म्हणाली.
कोणत्याही परदेशी कपड्यांसाठी किंवा इतर ब्रँन्डसाठी पैसे मोजण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या देशात तयार होणाऱ्या गोष्टी विकत घेत. आपल्या लोकांना सहकार्य करा आणि भारतीय कपडे घाला, असा संदेशही रंगोलीनं आपल्या पोस्टमधून यावेळी दिला आहे.