मुंबई - 'तेजस' या आगामी चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमाद्वारे भारतीय सैन्यदलाने करून दाखवलेली पराक्रमाची कथा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. 'तेजस' एक साहसी आणि निडर फाइटर पायलटची कहाणी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सर्वेश मेवारा यांचे कंगनाने कौतुक केले आहे. या दिग्दर्शकाकडे प्रतिभेचे भांडार आहे, असे ती म्हणाली.
तेजसचे दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांच्यासमवेत स्वतःचा फोटो पोस्ट करीत कंगनाने लिहिलंय, "चित्रपट बनवण्याचा सर्वात आश्चर्यकारक पैलू म्हणजे आपल्याला बरेच आश्चर्यकारक कलाकार भेटत असतात. प्रतिभेचे भांडार असलेल्या या जाणून घेणे आनंददायी आहे, हे आहेत आमचे लेखक-दिग्दर्शक आणि आमच्या तेजस टीमचे कप्तान सर्वेश मेवारा.''
कंगनाने दिली मेजवानी..
कंगनाने ट्विटसोबत दोन लहान व्हिडिओ क्लिप्स शेअर केल्या आहेत ज्यात कंगना आणि तिच्या कुटुंबीयांनी दिग्दर्शक मेवारा आणि प्रशिक्षक अभिजीत गोखले यांच्यासाठी जेवणाची मेजवानी दिली होती.
कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला 'तेजस' एक साहसी आणि निडर फाइटर पायलटची कहाणी आहे. 2016 मध्ये भारतीय वायु सेना महिलांना प्रत्यक्ष युद्ध भूमिकेत सहभागी करणारी देशातील पहिलीच सुरक्षा सेना होती आणि हा चित्रपट याच ऐतिहासिक घटनेने प्रेरित आहे.
सर्वेश मेवाडाद्वारे याने या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाद्वारे देशाच्या सशस्त्र दलांना सलाम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -करण जोहरवरील आरोपाला प्रत्युत्तर : कंगनाला वास्तव माहिती नाही