मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये तिचे माजी कथित प्रियकर हृतिक रोशन आणि आदित्य पंचोली यांचा 'दयाळू आत्मा' असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्र शासनाबाबत नुकत्याच झालेल्या अनुभवाचे वर्णन करीत कंगनाने या दोन्ही कलाकारांची नावे घेतली आहेत.
कंगनाने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय, "गेल्या काही महिन्यापसून माझ्यावर अनेक कायदेशीर खटले, छळ, अपमान असा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून होत असताना बॉलिवूड माफिया आणि आदित्या पांचोली आणि ह्रतिक रोशनसारखे लोक मात्र त्यांना दयाळू लोकांसारखे दिसत आहेत ....मला आश्चर्य आहे की माझ्यामध्ये असे काय आहे ज्यामुळे या लोकांना इतका त्रास होतो. "