महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गोव्यात घाण पसरवण्यावरुन कंगनाने साधला करणवर निशाणा

कंगना रणौतचे करण जोहरवरील हल्ले सुरूच आहेत. करणच्या धर्मा प्रॉडक्शनचे एक शूटिंग अलिकडेच गोव्यातील नेरुळ गावात पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट्स घालून हे शूटिंग पार पडले असले तरी, त्यातून बायोमेडिकल वेस्टसह प्लास्टिकचा भरपूर कचरा तिथेच टाकून टीम रवाना झाली आहे. याची तक्रार कंगनाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला टॅग करुन केली आहे. फिल्म इंडस्ट्री केवळ देशाच्या नैतिक मूल्ये आणि संस्कृतीसाठी एक विषाणू बनली नसून पर्यावरणासाठीही घातक बनली असल्याचे तिने म्हटलंय.

Kangana became aggressive
कंगनाने साधला करणवर निशाणा

By

Published : Oct 28, 2020, 1:22 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सिनेनिर्माते करण जोहरवर टीका करणारा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने एका चित्रपटाचे शूटिंग गोव्यातील एका गावात पूर्ण केले. या चित्रपटात दीपिका पदुकोणही काम करीत होती. शूटिंगनंतर प्लास्टिक, बायोमेडिकल वेस्ट, टॉयलेट पेपर्स असा भरपूर कचरा तिथेच टाकून टीम निघून गेली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यावर एका मीडिया रिपोर्टचा व्हिडrओ कंगनाने शेअर करून धर्मा प्रॉडक्शनच्या या कृतीवर आक्षेप घेतलाय.

कंगनाने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करीत लिहिलंय, "फिल्म इंडस्ट्री केवळ देशाच्या नैतिक मूल्ये आणि संस्कृतीसाठी एक विषाणू बनली नसून पर्यावरणासाठीही घातक बनली आहे. एका तथाकथित मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे हे घाणेरडे आणि बेजबाबदार वागणे पाहा. कृपया मदत करा.''

गोव्यातील नेरुळ गावात दीपिका पदुकोणचे शूटिंग नुकतेच पार पडले. त्यानंतर झालेल्या कचऱ्याची बातमी एका युजरने स्क्रिनशॉटसह शेअर केली होती. त्यानंतर कंगनाने आक्रमक होत ही पोस्ट शेअर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details