मुंबई- बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता वरुण धवन यावेळी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला. काही दिवसांपूर्वीच तो 'कलंक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, चित्रपटाला प्रेक्षकांची नापसंती मिळाली, यावर प्रतिक्रिया देत कलंक हा एक वाईट चित्रपट असल्याचे वरुणने म्हटलं आहे.
वरुण म्हणतोय, 'कलंक' वाईट चित्रपट; ज्याने प्रेक्षकांची निराशा केली - madhuri dixit
आलिया भट्ट, वरूण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉयसारखी तगडी स्टारकास्ट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट प्रेक्षकांची निराशा करणारा ठरला असल्याचे वरुणने म्हटलं आहे.
आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉयसारखी तगडी स्टारकास्ट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट प्रेक्षकांची निराशा करणारा ठरला असल्याचे वरुणने म्हटलं आहे. एका माध्यमाशी बोलताना त्याने म्हटलं की, कलंकला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नाही, कारण हा चित्रपट चांगला नव्हता आणि यासाठी कुठेतरी आम्ही सर्वच जबाबदार आहोत.
एखादा चित्रपट बनवताना त्यात संपूर्ण टीमचं योगदान असतं. त्यामुळे, चित्रपटाला यश न मिळाल्यास केवळ दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना जबाबदार समजणं चुकीचं आहे. या टीमचा एक भाग असल्यामुळे या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी माझीदेखील आहे. माझ्या मते, अपयश हेदेखील गरजेचं आहे. कारण, ते न आल्यास हे सिद्ध होणार नाही, की मी माझ्या कामावर किती प्रेम करतो, असं म्हणत वरुणने चित्रपटाच्या अपयशावर आपलं मत मांडलं.