मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कलंक' चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील नवनवीन गाणी आणि कलाकारांचे लूक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशात आता लवकरच 'कलंक'चं टायटल ट्रॅकही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जल्द ही छायेगा प्यार, 'कलंक'चं टायटल ट्रॅक लवकरच होणार प्रदर्शित - sonakshi sinha
कलंक नहीं ईश्क हैं काजल पिया, असे या गाण्याचे शीर्षक आहे. यासोबत चित्रपटातील कलाकारांचे खास पोस्टरही शेअर केले आहेत

जल्द ही छायेगा प्यार.. असं शीर्षक देत कोमल नहाटा यांनी याबद्दल माहिती दिली आहे. कलंक नहीं ईश्क हैं काजल पिया, असे या गाण्याचे शीर्षक आहे. यासोबत चित्रपटातील कलाकारांचे खास पोस्टरही शेअर केले आहेत. चित्रपटाचे हे नवे पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.
या पोस्टरमध्ये आलिया-वरूण, सोनाक्षी-आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त-माधुरी अशा जोड्या पाहायला मिळत आहेत. चित्रपटातील हे गाणं नेमकं कधी प्रदर्शित होणार याबद्दल माहिती देण्यात आली नाही. मात्र, लवकरच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे निश्चित.