मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेला बहुप्रतिक्षीत 'कलंक' चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला. आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दिक्षित, संजय दत्त अशी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली. 'कलंक'च्या टीजरपासून ते ट्रेलर आणि यातील भव्यदिव्य सेट्सपर्यंत हा चित्रपट चर्चेत होता. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या.
जाणून घ्या, आलिया-वरूणच्या 'कलंक'ची आत्तापर्यंतची कमाई - varun dhawan
प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपट काही प्रमाणात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
![जाणून घ्या, आलिया-वरूणच्या 'कलंक'ची आत्तापर्यंतची कमाई](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3056913-thumbnail-3x2-kalank.jpg)
मात्र, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपट काही प्रमाणात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ४४. ६५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशीच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी चित्रपटाने २१.६० कोटींचा गल्ला जमावला होता. तर शुक्रवारी चित्रपटाने ११.६० कोटींचा गल्ला जमवला.
हा चित्रपट वरुण आणि आलियाच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. तसेच, या चित्रपटाने 'केसरी', 'गली बॉय' आणि 'टोटल धमाल' या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेल्या कमाईचा विक्रम मोडला असला तरी चित्रपटाची स्टारकास्ट पाहता याकडून कमाईच्या बाबतीतही जास्त अपेक्षा होत्या. आता चित्रपट आणखी किती गल्ला जमवतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.