महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

काजोलने अजय देवगणला शिकवला सेल्फीचा धडा - Ajay Devgan latest news

बॉलिवूडची प्रसिध्द जोडी अजय देवगण आणि काजोल सोशल मीडियावर मजा मस्ती करताना दिसले.काजोलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून, अजयने जेव्हा तिला सेल्फी घेण्यास सांगितले तेव्हा काय घडले हे लिहिले आहे.

Kajol tutors Ajay
काजोल

By

Published : Feb 25, 2020, 6:50 PM IST

मुबंई - अभिनेत्री काजोल पती अजय देवगणला सेल्फी कसे घ्यायचे याचे धडे शिकवत आहे. काजोलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती पायऱ्यावर बसलेली दिसत आहे. हा फोटो अजयने काढला आहे.

हा फोटो शेअर करीत काजोलने म्हटलंय,

''मी - बेबी चला एक सेल्फी घेऊयात.

पती - जा तिथे बस मी फोटो काढतो.

मी - सेल्फीचा अर्थ तुम्ही आणि मी एकत्र उभे राहायचे असते आणि आपल्या दोघांपैकी एकाने फोटो काढायचा असतो.''

अजयनेही फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'सेल्फीमधले माझे व्हर्जन साधारणपणे कॅमेऱ्याच्या मागे आहे.'

अजय आणि काजोल सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतात.

त्यांच्या लग्नाला २१ वर्षे झाली आहेत. दोघांच्यातील नाते घट्ट असून दोघेही मजा मस्ती करण्यात गुंतलेले असतात.

अलिकडे दोघांनाही 'तान्हाजी' या चित्रपटात एकत्र पाहिले होते. या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

ABOUT THE AUTHOR

...view details