महाराष्ट्र

maharashtra

सावित्रीबाई मालुसरेंच्या करारी भूमिकेत झळकणार काजोल

By

Published : Nov 18, 2019, 10:59 AM IST

'तान्हाजी - द अनसंग वारियर' या आगामी चित्रपटातील काजोलचा लूक प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटातून काजोल पुन्हा एकदा पती अजय देवगणसोबत पडद्यावर झळकणार आहे.

अभिनेत्री काजोल


मुंबई - अभिनेत्री काजोल आगामी 'तान्हाजी - द अनसंग वारियर' या चित्रपटात सावित्रीबाई मालुसरे ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तिचा या चित्रपटातील लूक एका पोस्टरद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अभिनेत्री काजोल
काजोलने हे पोस्टर आपल्या ट्विटरवर प्रसिध्द केले असून कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''मैं आपको हारने नही दूँगी.''

'तान्हाजी - द अनसंग वारियर' हा चित्रपट १० जानेवारी २०१० ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलीज केला जाणार आहे.

या चित्रपटात काजोलचा पती अजय देवगण हा तान्हाजी मालुसरेंचे मुख्य व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा एक शिवकालिन ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट आहे. कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी तान्हाजी मालुसरे यांनी स्वतःचे प्राण पणाला लावून केलेल्या लढाईची ही गाथा मोठ्या पडद्यावर हिंदीत पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details