मुंबई- बॉलिवूडचे अनेक कलाकार आपल्या कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवण्यासाठी बाहेर जात असतात. मात्र, हे चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं, की कलाकारांचं संपूर्ण कुटुंब एखाद्या सामाजिक कामासाठी एकत्र येत हातभार लावतं. अशात नुकतंच काजल देवगणनं कुटुंबासोबत मिळून केलेलं एक काम अनेकांना प्रेरित करणारं आहे.
काजलनं भरपावसात हे काम करत दिला सामाजिक संदेश - सामाजिक संदेश
काजलशिवाय याठिकाणी अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीदेखील हजेरी लावली होती. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
नुकतंच मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या लोणावळा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काजलनं पावसात रेनकोट घालत आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या कामात हातभार लावला. यावेळी तिच्यासोबत आई तनुजा, बहिण तनीषा आणि आठ वर्षांचा मुलगा युग हेदेखील उपस्थित होते.
काजलशिवाय याठिकाणी अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीदेखील हजेरी लावली होती. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.