मुंबई- अॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अजयनेही नुकतीच वडील वीरू देवगण यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. तर आता काजोल त्यांच्या आठवणीत भावूक झाली आहे.
स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना आयुष्यभर वाट पाहावी लागली, सासऱ्यांच्या आठवणीत काजोल भावूक - singham
काजोलनं वीरू देवगण यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिले आहे. आनंदाचा क्षण, याच दिवशी त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळाला होता, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काजोलनं वीरू देवगण यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिले आहे. आनंदाचा क्षण, याच दिवशी त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळाला होता. मात्र, हे सिध्द करण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागलं. त्यांनी खऱ्या अर्थानं आयुष्य जगलं, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
केवळ अजय आणि काजोलचं नव्हे तर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी वीरू देवगण यांच्या आठवणी सांगत त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीनं एक उत्तम व्यक्ती गमवली असल्याचं म्हणत हळहळ व्यक्त केली. सध्या अॅक्शन चित्रपटांचा बाप म्हणून ओळखला जाणारा रोहित शेट्टीदेखील वीरू देवगण यांचाचा शिष्य आहे.