मुंबई - 'सिंघम' फेम अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. गेल्या वर्षी अभिनेत्री गरोदर असल्याची बातमी आली होती. याआधी नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबासोबत तिचा बेबी बंपचा फोटो सर्वांचे लक्ष वेधणारा होता. गरोदरपणापासून काजल अग्रवाल सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी संपर्कात आहे. काजल लवकरच तिच्या चाहत्यांना खुशखबर देणार आहे. आता अभिनेत्री काजलने तिच्या बेबी बंपचा आणखी एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काजल अग्रवालने पती गौतम किचलूसोबतचा एक छान फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा सुंदर कृष्णधवल फोटो (मोनोक्रोम) मध्ये आहे. या फोटोमध्ये काजल पती गौतमसोबत खूप आनंदी दिसत आहे. या फोटोत काजलच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. काजलच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करत काजलने लिहिले आहे की, 'हे आम्ही आहोत'.
त्याचवेळी काजलचा पती गौतमनेही हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम वॉलवर शेअर करून हेच कॅप्शन दिले आहे. काजलचे चाहते या फोटोवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.