मुंबई- संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित 'कबीर सिंग' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी'चा हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र, आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात न जाता फ्रीमध्येच तो डाउनलोड करत आहेत.
प्रदर्शनानंतर काही तासातच 'कबीर सिंग' चित्रपट ऑनलाईन लीक - kiara advani
'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित होताच अवघ्या काही तासांतच पायरेटेड वेबसाईट तमिळरॉकर्सवर ऑनलाइन लीक झाला आहे. निश्चितच याचा फटका चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला बसणार आहे.
होय, 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित होताच अवघ्या काही तासांतच पायरेटेड वेबसाईट तमिळरॉकर्सवर ऑनलाइन लीक झाला आहे. निश्चितच याचा फटका चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला बसणार आहे. चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यामुळे प्रेक्षकही सिनेमागृहात जाण्याऐवजी ऑनलाईन हा चित्रपट पाहात आहेत.
दरम्यान बॉलिवूडचा हा पहिला सिनेमा नाही, जो प्रदर्शित होताच लीक झाला आहे. तमिळरॉकर्सने याआधीही भारत, दे दे प्यार दे आणि टोटल धमालसारखे अनेक चित्रपट लीक केले आहेत. या वेबसाईटने बॉलिवूडशिवाय अनेक दाक्षिणात्य चित्रपटही लीक केले आहेत. अनेक चित्रपट निर्मात्यांनीही या साईडवर बॅन आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, याचा काहीही फायदा झालेला नसून कबीर सिंगदेखील या साईडच्या जाळ्यात अडकला आहे.