मुंबई - दाक्षिणात्य 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला 'कबीर सिंग' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. सिनेमाने केवळ ५ दिवसातच १०० कोटींचा गल्ला पार केला होता.
प्रदर्शानाच्या पाच आठवड्यानंतरही कबीर सिंगची जादू कायम, जाणून घ्या कमाई - विजय देवरकोंडा
हा सिनेमा शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १३४.४२ कोटींची कमाई केली होती.
आता प्रदर्शनाच्या पाच आठवड्यानंतरही 'कबीर सिंग'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पाचव्या आठवड्यात सिनेमाने ८.१० कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २७४.३६ कोटींचा गल्ला जमावला आहे.
हा सिनेमा शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १३४.४२ कोटींची कमाई केली होती. दरम्यान मूळ 'अर्जुन रेड्डी' चित्रपटात विजय देवरकोंडाने मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५१ कोटींची कमाई केली होती.