मुंबई - शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'कबीर सिंग' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळताना दिसत आहे. पहिल्या ५ दिवसांतच या चित्रपटानं १०० कोटींचा गल्ला पार केला होता. अशात आता चित्रपटानं द्विशतक करत बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे.
'कबीर सिंग' ठरला २०० कोटींचा गल्ला पार करणारा पहिला अॅडल्ट चित्रपट - shahid kapoor
'कबीर सिंग' या चित्रपटाला अॅडल्ट प्रमाणपत्र मिळालं होतं. अॅडल्ट प्रमाणपत्र मिळूनही २०० कोटींचा गल्ला जमवणारा बॉलिवूडचा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

'कबीर सिंग' या चित्रपटाला अॅडल्ट प्रमाणपत्र मिळालं होतं. अॅडल्ट प्रमाणपत्र मिळूनही २०० कोटींचा गल्ला जमवणारा बॉलिवूडचा हा पहिला चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या तेरा दिवसांत या सिनेमाने २०० कोटींचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक असून संदीप वंगा रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
विशेष म्हणजे 'अर्जून रेड्डी'ने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईचा आकडा शाहिदच्या 'कबीर सिंग'ने अवघ्या तीन दिवसांतच पार केला आहे. आर्टिकल १५ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही 'कबीर सिंग'च्या कमाईत फारसा फरक पडला नव्हता. मात्र, सोमवारनंतर चित्रपटाच्या कमाईत काही प्रमाणात घट झाली आहे.