मुंबई - बॉलिवूड चित्रपटांचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. प्रेमाच्या त्रिकोणानंतर बायोपिकची संकल्पना बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होती. मात्र, अशात शाहिदचा 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं पुन्हा एकदा दाखवून दिलं, की बॉलिवूडमध्ये कोणतीही संकल्पना जुनी होत नाही.
खिलाडी कुमार अन् रणवीरपेक्षा 'कबीर' ठरला वरचढ, बनवले हे रेकॉर्ड - bharat
सलमान खानची भूमिका असलेला २००३ मध्ये प्रदर्शित झालेला 'तेरे नाम' चित्रपट बहुतेकांनी पाहिला असेल. अगदी अभिनेत्रीच्या निरागसपणापासून अभिनेत्याच्या डॅशिंग आणि बिनधास्त अंदाजापर्यंत कबीर सिंग हा चित्रपट मॉडर्न तेरे नाम असल्याचेच जाणवते.
सलमान खानची भूमिका असलेला २००३ मध्ये प्रदर्शित झालेला 'तेरे नाम' चित्रपट बहुतेकांनी पाहिला असेल. अगदी अभिनेत्रीच्या निरागसपणापासून अभिनेत्याच्या डॅशिंग आणि बिनधास्त अंदाजापर्यंत कबीर सिंग हा चित्रपट मॉडर्न तेरे नाम असल्याचेच जाणवते. असं असतानाही आजच्या काळातही हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या यादीत कमाईच्या बाबतीत हा चित्रपट दुसऱ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी सलमान खानचा 'भारत' चित्रपट आहे. शाहिदच्या 'कबीर सिंग'ने अक्षयच्या 'केसरी', रणवीरच्या 'गली बॉय' आणि अजयच्या 'टोटल धमाल' चित्रपटालाही मागे टाकले आहे. कबीर सिंगने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १३४.४२ कोटींची कमाई केली आहे.