महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कबीर आणि प्रिती प्रेमात पडले, 'कैसे हुआ' गाण्याच्या तुम्हीही पडाल प्रेमात - shahid Kapoor

कबीर सिंग चित्रपटातील कैसे हुआ गाणे रिलीज झाले आहे. विशाल मिश्रा यांनी हे गाणे गायले असून संगीतही त्यांनीच दिलंय. २१ जूनला हा चित्रपट रिलीज होईल.

कैसे हुआ गाणे रिलीज

By

Published : Jun 13, 2019, 7:47 PM IST


मुंबई - कबीर सिंग या शाहिद कपूरच्या आगामी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. यातील 'कैसे हुआ' हे गाणे रिलीज झाले आहे. यात कबीर सिंग आणि प्रिती यांच्या प्रेमात पडण्याचा प्रसंग चित्रीत झाला आहे.

'कैसे हुआ' गाणे सोशल मीडियावर शाहिद कपूरने शेअर केले आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''वॉच कबीर और प्रिती को प्यार कैसे हुआ.''

'कैसे हुआ' हे गाणे मनोज मुंताशीर यांनी लिहिलेले आहे. हे गाणे विशाल मिश्रा यांनी गायले असून त्यांनीच याला संगीतबध्दही केले आहे.

'कबीर सिंग' हा चित्रपट तेलुगुमधील सुपरहिट ठरलेल्या 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक आहे. २१ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details